मर्चंट नेव्हीच्या जवानाला मारहाण : दहा जणांविरोधात गुन्हा
शिरपूर : तालुक्यातील विखरण येथे मागील भांडणाची कुरापत काढून सुट्टीवर आलेल्या 23 वर्षीय मुंबईत मर्चंट नेव्हीतील जवानाला बेदम मारहाण करण्यात आला. ही घटना शनिवार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. शहर पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रफुल्ल कृष्णा निकम (2,3 रा.मर्चंट नेव्ही, डेक कॅडेट, अंधेरी पूर्व मुंबई , ह.मु.विखरण, रा.शिरपूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे
जुन्या भांडणातून मारहाण
तरुणाच्या तक्रारीनुसार तक्रारदार प्रफुल्ल निकम हा 1 फेब्रुवारी 2022 पासून सुट्टीवर आला असून 19 फेब्रुवारी रोजी अंगणात उभा असतांना
शामकात सुभाष भदाणे, संजय गंभीर भदाणे, मेघराज संजय भदाणे, जयेश शाम भदाणे, चंद्रकांत रोहिदास पाटील, यज्ञेश दिलीप जाधव, सुनील गोटू पाटील, यश येसु जाधव, विवेक चंद्रकांत पाटील, जयेश रवींद्र भदाणे (सर्व रा.विखरण, ता.शिरपूर) यांनी मागील भांडणाची कुरापत काढून गैरकायदयाची मंडळी जमवून शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी देत हातातातील फाइटने डोक्यावर, पाठी मागील बाजूस मारून दुखापत केली तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या चुलत भाऊ किशोर लोटन पाटील, वडील कृष्णा बाजीराव पाटील यांना धक्काबुक्की करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक अनिल शिरसाठ करीत आहेत.


