भुसावळातील रेल्वे लोखंडी पुलावर अनोळखीचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू


भुसावळ : अप लूप रेल्वे लाईनवर कुठल्यातरी धावत्या मालगाडी आल्याने 55 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना 22 रोजी रेल्वे लोखंडी पुलाजवळ घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात ऑनड्युटी डीवायएसएस यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखीचे वय 55 वर्ष, उंची 5.5 फूट, रंग सावळा, चेहरा लांबट, केस डोक्यासमोर टक्कल व काळे-पांढरे, दाढी-मिशी बारीक, हाताच्या मनगट व कोनीवर दीपकचे चिन्ह तसेच अंगावरील पांढर्‍या रंगाच्या शर्टावर चंद्रकांत टेलर लिहिली असून अंगात राखाडी रंगाची पँट आहे. अशा वर्णनाच्या इसमाची ओळख पटत असल्यास लोहमार्ग पोलिस ठाण्याचे एएसआय किशोर बढे (98230-75787) यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !