रावेर तालुक्यातील शहरी भागात शासकीय धान्य पोहोचत नसल्याने लाभार्थी त्रस्त


रावेर : रेशन दुकानांवर थेट धान्य पोहोचवणार्‍या जिल्ह्यावरील धान्य वाहतूक यंत्रणेचा ढिसाळ कारभारामुळे लाभार्थींमधून संताप व्यक्त होत आहे. अद्याप जानेवारी महिन्याचे मोफतची धान्य वाटप बाकी असतांना फेब्रुवारी महिना संपण्यास आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना रावेर तालुक्यातील शहरी भागात रेगुलर व मोफतचे धान्य मिळालेले नाही यामुळे लाभार्थींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

नियमित व मोफत धान्याची प्रतीक्षा
रावेर शहरातील रेशन दुकानांवर जानेवारी महिन्याचे मोफत तर फेब्रुवारी संपत आला तरी रेगुलर व मोफत असे रेशनचे धान्य अद्याप प्राप्त झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळ असल्याने हातावर पोट असणार्‍या अनेक गरीब कुटुंब हवालदिल झाले आहेत. रेशन दुकानांवर धान्य तत्काळ पोहोचविण्याची मागणी लाभार्थींमधून होत आहे.

जानेवारीच्या साखरेची लाभार्थींना प्रतीक्षा
रेशन दुकानामार्फत दिली जाणारी साखर लाभार्थीना जानेवारी महिन्यात मिळाली नसल्याची ओरड होत आहे. आम्हाला जिल्हावरुनच साखर मिळाली नसल्याने आम्ही लाभार्थीना ती दिली नाही तर मागील वर्षाची ऑक्टोबर, नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याची साखर वाटप केली असून केवळ जानेवारी व फेबु्रवारी महिन्याची साखर वाटप बाकी असल्याचे पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !