अल्पवयीन मुलीला यावल तालुक्यातून फूस लावून पळविले


यावल : यावल तालुक्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
यावल तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होती. रविवार, 20 फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात असताना तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. शोध घेवूनही अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून न आल्याने अल्पवयीन मुलीचे वडीलांनी फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !