वरणगावातील रुग्णांना सुविधा द्या : जिल्हा शल्य चिकित्सकांना साकडे
वरणगाव : वरणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना परीपूर्ण सुविधा द्याव्यात, पुरेसा औषध साठा द्यावा तसेच संध्याकाळची ओपीडी सुरू करावी, छोटे ऑपरेशन थिएटर सुरू कराव, तसेच कर्मचारी संख्या त्वरीत वाढवून रीक्त पदे भरावे, वाढीव इमारत रुग्ण तपासणी कक्ष मंजूर करावा आदी मागण्यांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील यांना साकडे घालण्यात आले.
यांनी दिले निवेदन
भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, भाजपा शहरायक्ष सुनील माळी, उपाध्यक्ष नटराज चौधरी, हितेश चौधरी, सरचिटणीस गोलू राणे, भाजयुमोचे शहराध्यक्ष आकाश निमकर, साबीर कुरेशी, गजानन वंजारी, योगेश माळी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन वरणगाव भेटीवर आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले. परीपूर्ण औषध साठ्यासह पीएम रूमच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी त्वरीत हालचाली करण्यात येतील व संध्याकाळची ओपीडी सुद्धा सुरू करण्यात येईल तशीच वाढीव इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन तो जिल्हा नियोजन समितीला पाठविण्यात येईल, असे ठोस आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.क्षितीजा हिंडवे व दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते.


