भुसावळातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा : अखेर वीज झाले कमी


भुसावळ : जादा वीज बिले पाठवून महावितरण कंपनीने शहरातील विविध वीज ग्राहकांना मोठा शॉक दिला होता मात्र भुसावळातील प्रा.धीरज पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर वीज कंपनीने या ग्राहकांना पाठवलेले जादा वीज बिल कमी केल्याने वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जादा वीज बिलामुळे ग्राहक त्रस्त
अयोध्या नगर, मोहित नगर, श्रीनगर, भोई नगर, गणेश कॉलनी, गोदावरी नगर, अष्टविनायक कॉलनी, खळवाडी परीसरातील ग्राहकांना अतिरीक्त रक्कमेची वीज देयके महावितरणतर्फे देण्यात आली. महाराष्ट्र वीज हक्क संघटनेच्या प्रा.धीरज पाटील, विशाल ठोके, मिलिंद उंबरकर, अमोल पाटील, सुरज चौधरी, देवेश सपकाळे यांच्याकडे या ग्राहकांनी तक्रार मांडली होती. कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केल्यानंतर अशोक गिरधर नारखेडे, वैशाली प्रकाश खडसे, हेमराज ज्ञानदेव खडसे, सुमनबाई भागवत उंबरकर, विठ्ठल तुकडू कोळी, जय मिस्त्री, विजय सूर्यभान पाटील, संजय एकनाथ पाथरवट आदी ग्राहकांकडील सुमारे 85 हजार रुपये रकमेपर्यंत वीज बिल कमी होवून मिळाले आहे.







ग्राहकांनी देयके तपासावे : प्रा.धीरज पाटील
ग्राहकांनी प्रत्येक महिन्यात येणारी देयके तपासली पाहिजे, सोबतच मीटर नंबर, मिटरवरील रीडींग ह्या सर्व बाबींवर काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. परीसरातील ग्राहकांना वीज देयकांची समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन प्रा.धीरज पाटील यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !