खत विक्रीच्या नावाखाली एक कोटी 30 लाखांची फसवणूक
जळगाव : पुण्यातील खत तयार करणार्या कंपनीसोबत ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणार्या दोघांसह कंपनीच्या जिल्ह्यातील अधिकार्याने खतांची त्रयस्थ कृषी केंद्रांना परस्पर विक्री करून 1 कोटी 30 लाख 77 हजार 369 रुपयांत फसवणूक केली. 2018 ते 2021 दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी शनिवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
कंपनीचे झोनल मॅनेजर वैभव कमलकिशोर राठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी राधेश्याम व्यास, नितीन व्यास व योगेश जाधव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


