राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा सावद्यात राष्ट्रवादीतर्फे निषेध
सावदा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल काढलेल्या अवमानकारक विधानाचा सावदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला. सावदा पोलिस प्रशासनाला या संदर्भात निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली. सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले यांनी निवेदन स्वीकारले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी माजी नगरसेवक राजेश वानखेडे, अजय भारंबे, नंदाबाई लोखंडे, बाजार समिती सदस्य पंकज येवले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष कुशल जावळे, युवक शहराध्यक्ष गौरव वानखेडे, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष साईराज वानखेडे, राजेश कोल्हे, दीपक पाटील, डी.के.पाटील, तेजस वंजारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


