पॉर्न व्हिडिओ पाहताच त्यांनी केला दोघा अल्पवयीनांवर अत्याचार
पाटणा : जागतिक महिलादिनानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान होत असताना बिहारमध्ये मात्र धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातील बारबिघा पोलीस ठाण्याच्या परीसरात 5 अल्पवयीन मुलांनी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला.
पॉर्न पाहून अत्याचार
शेतात आलेल्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्यानंतर संशयीतांनी कोणालाही माहिती न देण्याची धमकी त्यांनी दिली. नातेवाईकांना हे समजताच त्यांनी त्या दोन मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र तिघे पसार झाली. विधी संघर्ष बालकांपैकी 3 जण 6 वीच्या वर्गात शिकत आहेत. तसेच एक विधी संघर्ष बालक 7 वीत तर दुसरा 8 वीच्या वर्गात शिकत आहे. सापडलेली दोन मुले आणि पळून गेलेली तीन मुले ही एकाच गावचे रहिवासी आहेत. पॉर्न व्हिडिओ पाहिल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.




बालकांची रीमांड होममध्ये वानगी
विधी संघर्ष बालक अल्पवयीन असल्याने सध्या ते बाल कल्याण संकुल येथे रिमांड होममध्ये आहेत. यांच्यावर कलम 164 अंतर्गत न्यायदंडाधिकार्यांसमोर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 376 डी, 506 (2), 120 (बी) आणि 114 यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.