अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलिस अधिकार्‍याने घेतली तब्बल 37 लाखांची लाच


ACB TRAP मुंबई : तब्बल सात लाखांची लाच घेणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. भरत मुंढे (33) (Psi bharat munde) असे या अटकेतील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो सध्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असून बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी वरीष्ठांच्या नावे तसेच तक्रारदाराच्या नावे ही लाच मागण्यात आली.

सहआरोपी न करण्यासाठी मागितली लाच
लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका तरुणाच्या नातेवाईकाविरुद्ध बलात्काराचा (rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक भरत मुंढे याने या तरुणाकडे 37 लाखांची मागणी केली. यातील पाच लाख स्वतःसाठी, दोन लाख वरीष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी आणि 30 लाख तक्रारदार तरुणीला देण्यात येतील, असे मुंढे याने या तरुणाला सांगितले. इतकी मोठी रक्कम आणणार कुठून? असा प्रश्न पडल्याने या तरुणाने मुंढे याला होकार देत त्याच्याविरोधात वरळीतील एसीबीच्या (warli acb office) कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.





सापळा रचून पकडले
एसीबीच्या पथकाने या तरुणाने दिलेल्या तक्रारीची शहानिशा केली आणि त्यानुसार सोमवारी सापळा रचला. या तरुणाकडून सात लाख रुपये घेताना भरत मुंढे याला एसीबीच्या अधिकार्‍यांनी पकडले. मुंढे याच्याविरुद्ध एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 आणि 7अ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकार्‍याने सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !