देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले : पेनड्राइव्ह बॉम्ब ही तर झलक ; पिक्चर अभी बाकी है…!


Devendra Fadnavis Pen Drive Bomb मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी विधानसभेत ‘पेन ड्राईव्ह’ देवून थेट पुरावे दिल्याचा बॉम्ब फोडताच राज्यात खळबळ उडाली होती तर कालचा पेनड्राइव्ह बॉम्ब ही केवळ एक झलक असून पिक्चर अभी बाकी है… आणखी बॉम्ब ठेवलेत, असा गर्भीत इशारा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा दिल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. बुधवारी आझाद मैदान ते विधान भवनापर्यंत धडक मोर्चाचे काढण्यात आला तर आझाद मैदानातून निघालेला मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडणण्यात आला. तत्पूर्वी आझाद मैदानात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टिकेचे बाणही चालवले.

राजीनामा नाही तोवर शांत बसणार नाही
दहशतवाद्यांसोबत आर्थिक व्यवहार असलेल्या आरोपामुळे जेलमध्ये गेलेल्या मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोवर शांत बसू शकत नाही. ही मागणी केवळ राजकारणासाठी नाही. आम्ही रोज राजीनामे मागत नाही. मात्र ही घटना पाहिली तर मुंबईकरांच्या मारेकर्‍यांसोबत ज्यांनी आर्थिक व्यवहार केले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला. हा संघर्ष साधा नाही. तर देशभक्तांचा संघर्ष आहे. देशद्रोह्याच्या विरोधात संघर्ष आहे. पाकिस्तान धार्जिण्या लोकांविरोधात संघर्ष आहे. ज्या भारतमातेसाठी अनेकांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे, असेही फडणवीस (Devendra Fadnavis)  म्हणाले.



देवेंद्र फडणवीस म्हणाले ; पिक्चर अभी बाकी है
एका नरेंद्र मोदीला संपवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आला परंतु जनतेचा आशीर्वाद असल्यानं ते जागतिक नेते झाले. आम्ही मोदींचे सैनिक आहोत. त्यांचा आशीर्वाद आमच्यामागे आहे. आमचे संबंध गुन्हेगारांशी नाही. आमच्याविरोधात कितीही षडयंत्र केले तर शिवरायांच्या आशीर्वादाने ते हाणून पाडू. आमच्याकडे अनेक बॉम्ब आहेत. योग्यवेळी तो फोडला जाईल, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. विधानसभेतील आपल्या आरोपांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कालचा पेनड्राइव्ह बॉम्ब ही केवळ एक झलक होती. पिक्चर अभी बाकी है… आणखी बॉम्ब ठेवले आहेत. तुम्ही आमच्याविरोधात षडयंत्र करत आहात पण आम्ही घाबरणार नाही.

उद्धव ठाकरेजी तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावे लागेल
नवाब मलिक आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर होती. या पैशाचा वापर मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यासाठी झाला. काळ्या पैशातून जमीन खरेदी करून टेरर फंडिंग केले गेले. या टेरर फंडिंगला महाराष्ट्रातील मंत्री मदत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला एकदिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावे लागेल. कुणाच्या दाढ्या कुरवाळताय? तुम्ही मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तरी आमचा संघर्ष सुरूच राहील, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी स्पष्ट केले. शरद पवार (Sharad Pawar) म्हणतात की, राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही ते (Devendra Fadnavis)  यावेळी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !