भुसावळात कायदा हातात घेणार्‍यांची गय नाही : आगामी काळात समूळ गुन्हेगारी नष्ट होणार !

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांचा विश्वास ः दोषारोपपत्रात त्रृटी न ठेवण्याच्या सूचना


Special Inspector General of Police Dr. BG Shekhar Patil Nashik भुसावळ : पोलिस प्रशासनावर हात उचलणार्‍यांना कायद्याच्या माध्यमातून सरळ करण्यात आले असून यापूर्वीच सहा जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली असून आगामी काळात शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावीपणे पोलिस प्रशासन काम करेल, असा विश्वास नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील (Special Inspector General of Police Dr. BG Shekhar Patil)  यांनी यांनी शहरात व्यक्त केला. भुसावळातील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी आले असता माध्यमांनी त्यांच्या संवाद साधला असता ते बोलत होते.

भुसावळ बाजारपेठ ठाण्याची वार्षिक तपासएणी
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील (Special Inspector General of Police Dr. BG Shekhar Patil) यांचे भुसावळात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे (dysp somnath waghchure) यांनी स्वागत केले. प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी महानिरीक्षक बी.जी. शेखर यांना सलामी देण्यात आली.





गुन्ह्यांची जाणून घेतली माहिती
यावेळी पोलिस ठाण्यातील विविध फाईल, रजिष्टर यांची पाहणी डॉ.बी.जी.शेखर पाटील (Special Inspector General of Police Dr. BG Shekhar Patil) यांनी केली. दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासाची माहिती त्यांनी घेत दाखल गुन्ह्यांचा तपास कसा सुरू आहे, तपास कुठपर्यंत आला याबाबत त्यांनी अधिकार्‍यांना विचारणा केली. यावेळी पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून माहिती घेतली. दरम्यान, भुसावळातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी एमपीडीए, मोक्काच्या कारवाया अधिक प्रमाणात करण्याच्या त्यांनी सूचना केल्या तसेच प्रत्येक गुन्ह्याचे दोषारोपपत्र दोन महिन्यांच्या हात न्यायालयात सादर करण्यात यावे, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

डीवायएसपी कार्यालयाची पाहणी
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील (Special Inspector General of Police Dr. BG Shekhar Patil) यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याची पाहणी केल्यावर डीवायएसपी कार्यालय व तालुका पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिस ठाणे व डीवायएसपी कार्यालयांची पाहणी केली. यावेळी भुसावळ, मुक्ताईनगर विभागातील पोलिस अधिकार्‍यांच्या मुलाखती घेतल्यात, त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !