Rashmi Shukla माजी मंत्री खडसे व खासदार राऊत फोन टॅपींग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची गुन्हा रद्दसाठी न्यायालयात धाव
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Ncp Leader Eknath Khadse) व शिवसेनेचे नेते संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या ज्येष्ठ आयपीसी अधिकारी रश्मी शुक्ला (Senior IPS Officer Rashmi Shukla) यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. गत आठवड्यात फोन टॅपिंगप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात (Kulaba Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजकीय हेतून गोवण्यात आल्याचा आरोप
राजकीय हेतूने व नाहक आपल्यावर आरोप करून गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे रश्मी शुक्ला (Senior IPS Officer Rashmi Shukla) यांनी याचिकेत म्हटले आहे. गुरुवारी ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्या.पी.बी.वराळे व न्या.एस.एम.मोडक यांच्या खंडपीठापुढे ही याचिका नमूद केली.




पोलिस आयुक्तांच्या तक्रारीनंतर गुन्हा
शिवसेनेचे नेते संजय राऊत (MP Sanjay Raut) व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ncp Leader Eknath Khadse) यांचे बेकायदेशीररीत्या फोन टॅप केल्याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त (स्पेशल ब्रँच) राजीव जैन यांनी तक्रार केली. शुक्ला (Senior IPS Officer Rashmi Shukla) यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 165 व टेलिग्राफ कायद्याचे कलम 26 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
बंड गार्डन पोलिसातही दाखल आहे गुन्हा
फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यानेही शुक्ला यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. तो गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठीही शुक्ला यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. 4 मार्च रोजी न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना 25 मार्चपर्यंत अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर पुण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.