संतापजनक : विद्यार्थिनींसोबत मुख्याध्यापकानेच केले अश्लील चाळे ; यावल तालुक्यातील प्रकार


यावल : यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील एका जिल्हा परीषद शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याची तक्रार स्थानिक शालेय समितीच्या अध्यक्षांनी पंचायत समितीकडे केली आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली. आता पुढे काय कारवाईकडे लक्ष लागले आहे.

शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडे ग्रामीण भागातील स्थानिक शालेय समितीच्या अध्यक्षांनी तक्रार केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील शाळेतील मुख्याध्यापकाने मुलींशी अश्लील चाळे केल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी शिक्षण विभागास दिले होते तर शुक्रवारी या प्रकरणी गटशिक्षण अधिकारी नईम शेख यांनी संबधीत शाळेवर जावून जाब-जबाब नोंदवत चौकशी केली व येथील विद्यार्थीनी आणि पालकांशी संवाद साधला.



धक्कादायक प्रकाराने पालक संतप्त
यावेळी पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. याप्रसंगी पाडळसे केंद्र शाळेचे केंद्र शिक्षक सुनील पाटील उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी शेख यांनी अहवाल गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडे सादर केल असून पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !