खासदार शरद पवारांचा संबंध दाऊदशी जोडला : निलेश राणे व नितेश राणेंविरोधात गुन्हा


मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा (Sharad Pawar) संबंध थेट दाऊद इब्राहिमशी जोडल्याने निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane)  यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोघांविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

आक्षेपार्ह विधानानंतर दाखल झाला गुन्हा
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्यावर ईडीकडून केल्या जाणार्‍या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. ईडीने नवाब मलिक (nawab malik) यांना अटक केली असून, त्यांना सुरुवातीला ईडी कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक (nawab malik) यांच्यासंदर्भात थेट शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचे विधान केले होते. यानंतर आता राणे बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



गुन्हा दाखल असल्यास अभ्यास करून उत्तर देणार : नितेश राणे
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, त्याला सरकारच जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तरीही मुंबईला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे, ते कशासाठी, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तर, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असेल, तर त्यावर अभ्यास करून उत्तर दिले जाईल. आम्ही काय चुकीचे बोललो आहे, आम्ही हिंदुत्वाची बाजू घेतलेली आहे. आम्ही कोणतीही दंगल भडकवण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे नितेश राणे (nitesh rane) यांनी स्पष्ट केले आहे.

पुराव्यादाखल दिला पेन ड्राईव्ह
दरम्यान, राणे बंधू नितेश (nitesh rane) आणि निलेश राणे (nilesh rane) यांनी जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण केला आहे. शरद पवार यांचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वारंवार प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य करत आहेत. राणे बंधू यांनी अनिल देशमुख हिंदू आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. तर नवाब मलिक (nawab malik) मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असे वक्तव्य केली जात आहेत. शरद पवार यांचा दाऊदशी संबंध आहे, असे वक्तव्य करून शरद पवार याच्या जीवाला धोका निर्माण केला असल्याने राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण (suraj chavan) यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांना यांसंदर्भातील पुराव्याचा पेनड्राइव्ह दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !