ज्येष्ठ नागरीक आमच्या कुटुंबातील ज्ञान व अनुभवांचे समृद्ध विद्यापीठ

प्रा.डॉ.जतीन मेढे : वेडीमाता जेष्ठ नागरीक संघातर्फे ज्येष्ठांचा सन्मान


भुसावळ : जीवनातील सुख-दुःखाचे अनेक प्रसंग झेललेले ज्येष्ठ नागरीक आपल्या भारतीय कुटुंबातील पुढच्या पिढीला दिशा व मार्गदर्शन करणारे समृद्ध विद्यापीठ आहे. त्यांचा सन्मान व आदर आमच्या कुटुंब व्यवस्थेने राखलाच पाहिज,े असे प्रतिपादन प्रागतिक चळवळीचे व साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी केले .

कुटूंबात व समाजात कार्यरत रहा
शहरातील वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भुसावळ विद्यालयाच्या प्रांगणात प्रा.मेढे बोलत होते. अध्यक्षस्थानी वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रामदास खर्चे होते. मंचावर उपाध्यक्ष बाबुराव पाटील उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरीकांशी संवाद साधतांना प्रा.मेढे म्हणालेत की, तुम्ही निवृत्त झाला आहात, आपले वय झाले आहे, असले निराशावादी शब्द मनातून काढून टाका. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यमग्न आपले जीवन व्हावे या विचाराने कुटूंबात व समाजात कार्यरत राहा.वर्तमानातील कुटूंब व समाज जीवनातील ढासळती मूल्य व्यवस्था पाहता तुमचे मार्गदीप होऊन कुटूंब व समाजात असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शरीर थकलेले असले तरी मनाला थकू देऊ नका. कारण ज्येष्ठ नागरिक आमच्या भारतीय कुटुंब व्यवस्थेचा दोन पिढ्यांचा मार्गदीप आहे. यावेळी संघातील ज्येष्ठ सदस्यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. आभार संघाचे सचिव मेघ:शाम फालक यांनी तर पाहुण्यांचा परीचय राजेंद्र जावळे यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !