रावेरात उद्योजक श्रीराम पाटीलांनी जाणल्या शेतकर्‍यांच्या समस्या


रावेर : रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाने शासनाच्या आधारभूत किंमतीवर आधारीत सुरू केलेल्या हरभरा खरेदी केंद्राला श्रीराम फाऊंडेशन अध्यक्ष उद्योजक श्रीराम पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन तथा संचालक जिजाबराव चौधरी, मॅनेजर विनोद चौधरी, शिवाजीराव पाटील, सचिन पाटील, राजेंद्र चौधरी, आशु पाटील, ग्रेडर प्रशांत पाटील, मनोज शिंदे, शेख रईस आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !