यावल तालुका समन्वय समिती अध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे


यावल : यावल तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जिल्हा परीषदेतील गटनेते प्रभाकर सोनवणे यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार ही निवड झाली. समिती पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी तर सदस्य म्हणून खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, लीलाधर विश्वनाथ चौधरी, नितीन चौधरी, प्रा.मुकेश येवले, रवींद्र सोनवणे, जयश्री विकास पाटील (सांगवी खुर्द), ललिता विलास चौधरी (फैजपूर) व प्रेरणा युवराज भंगाळे (सांगवी) यांची निवड झाली. निवड झालेल्या पदाधिकार्‍यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !