अप-डाऊन नवजीवन एक्स्प्रेस नवीन रुपात धावणार


भुसावळ : अप -डाऊन चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेसला आता एलएचब डबे जोडण्यात येत असून नव्या रुपात ही गाडी आता धावणार असल्याने प्रवास अधिक सुखकर होणार आहे. गेल्या आठवडेभरापासून या गाडीचे परीक्षणही करण्यात आले. रविवार, 3 नोव्हेंबरपासून अप गाडी 12656 चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस नव्या रूपात धावणार आहे तर डाऊन 12655 अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेसला 5 नोव्हेंबरपासून एलएचबी कोचेस जोडण्यात येणार आहे. नवीन कोचसमध्ये एलईडी लायटींग असून ब्रेक सिस्टम अपडेट आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !