खंडवा लोहमार्ग पोलिसांना वॉण्टेड असलेला घरफोड्या जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
भुसावळ : खंडवा लोहमार्ग पोलिसांना घरफोडीच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. आकाशशिंग लालबहादूरसिंग परीहार (28, रा.महाजन ठोला, गुडगाव, जि.रीवा मध्यप्रदेश, ह.मु.जाम मोहल्ला, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
संशयीत आरोपीविरुद्ध खंडवा लोहमार्ग पोलिसात गुरनं.201/2019, भादंवि 380 प्रमाणे 13 सप्टेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल होता मात्र आरोपी पसार झाल्याने त्याने भुसावळात आश्रय घेतला. आरोपी भुसावळात असल्याबाबत खंडवा लोहमार्ग पोलिसांचे सहाय्यक फौजदार संदीप मीना यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसांना शनिवारी कळवल्यानंतर गोपनीय माहितीवरून आरोपीच्या बसस्थानक परीसरातून मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीला खंडवा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रावसाहेब किर्तीकर, अनिल मोरे, हवालदार सुनील जोशी, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.



