एरंडोलच्या प्राध्यापकाची प्लॉट खरेदीत 37 लाखांची फसवणूक : दोघांना अटक
एरंडोल : शहरातील सेवानिवृत्त प्राध्यापक रघुनाथ शंकर निकुंभ यांची प्लॉट खरेदीत तब्बल 37 लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
भुसावळातील आनंद लॉजमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश : या ग्राहकांना झाली अटक
आरोपींच्या अटकेनंतर खळबळ
इस्टेट ब्रोकर आनंदा रामदास चौधरी (एरंडोल), राजेंद्र अमृत धनगर (एरंडोल) यांनी प्रा.निकुंभ यांची 37 लाखात फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणात स्टॅम्प वेंडर उमेश श्रीराम पाटील याने सहकार्य केल्याचा आरोप आहे. एरंडोलचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी तपासचक्रे गतिमान करून धनगर व चौधरी यास अटक केली आहे.


