जळगाव जिल्हा बॉक्सींग असोसिएशन अध्यक्षपदी अनिल चौधरी


भुसावळ : जळगाव जिल्हा बॉक्सींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी अनिल छबीलदास चौधरी तर सचिवपदी विजय नारायण सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारीणीत सहसचिव असलम इमामा सय्यद, उपाध्यक्षपदी स्वर्ण आन्स्लम संधू, खजिनदार स्टीफन बेझोमान डेवी तर सदस्यांमध्ये प्रदीप अशोक गायकवाड, प्रकाश नरेंद्र जाधव, महेंद्र एकनाथ मेढे, सुनील भीमराव सोनवणे, रमण एकनाथ भोळे, राजेंद्र फुलचंद मालवीय, आनंद निंबाजी हुसळे यांचा समावेश आहे.

कंडारीच्या इसमाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
जिल्हा बॉक्सींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी अनिल चौधरी यांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. महाराष्ट्र बॉक्सींग संघटनेचे महासचिव राकेश तिवारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर लवकरच त्यांच्या उपस्थितीत भव्य महाराष्ट्रस्तरीय बॉक्सींग स्पर्धा भुसावळात घेण्याचा मानस वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मिलिंद साळुंके व संजय बांगर यांनी उपाध्यक्ष व सहसचिवपदाचा राजीनामा दिला असून नुतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.



गोव्यातील समुद्रात बुडाल्याने भुसावळातील तरुणाचा मृत्यू





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !