यावल-बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग दुरुस्तीची मागणी
यावल : यावल-बर्हाणपूर-अंकलेशवर महामार्ग यावल शहरातून गेलेला असून वनविभागपासून ते बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रस्त्यावर दररोज कोणत्याही वाहनाच्या अपघात होत असतो यामुळे मोठी वित्तहानी सुद्धा झाली आहे. या रस्त्यासह हडकाई नदीच्या पलावर मोठे-मोठ्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी युथ काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख आलीम मोहम्मद, रफीक शारीक खान, शेख अकील बागवान, तन्वीर मन्यार शोएब खान, शेख इमरान आदी उपस्थित होते.


