पारोळा तालुक्यातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार


पारोळा : पारोळा तालुक्यातील एका गावातील सहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत दोन अल्पवयीन मुलांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलांनीच केला अनैसर्गिक अत्याचार
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात 6 वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 26 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील मंदिरात मुलगा दर्शनासाठी गेला होता. त्यासोबत एक 15 वर्षीय व 16 वर्षीय असे दोन अल्पवयीन मुले देखील सोबत होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गावातील जिल्हा परीषद शाळेच्या पाठीमागे दोन्ही अल्पवयीन मुलांनी सहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलाच्या नातेवाईकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला होता.



अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा
दरम्यान, हा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मुलाच्या नातेवाईकांनी बघितला असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही अल्पवयीन मुलांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !