चाळीसगावात 50 लाखांच्या गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला
चाळीसगाव : चार दिवसांपूर्वीच भुसावळ सव्वा दोन कोटींचा गुटखा पकडल्याचे प्रकरण ताजे असताना मंगळवारी चाळीसगावात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला आहे. या कंटेनरमध्ये सुमारे 50 लाखांवर किंमतीचा गुटखा असल्याची माहिती आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कंटनेर (क्र. एच.आर.38 ए.बी.6096) चा पाठलाग करून त्यास अडवल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तसेच चौकशीकामी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ग्रामीण पोलीसांचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.


