भुसावळात भाजपा युवा मोर्चाच्या तीन शाखांचे उद्घाटन

आमदार सावकारे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त उपक्रम ः कार्यकारीणी जाहीर


भुसावळ : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या तीन शाखांचे शहरातील प्रभाग 24 मध्ये नाहाटा महाविद्यालयाजवळ तसेच प्रभाग पाचमध्ये नाटकर चौक येथे व प्रभाग 10 मध्ये दामू कुंभार वाड्याजवळ आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा युवा मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थित होते. भाजपाचा 42 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा शाखेचे बुधवारी उद्घाटन झाले.

जळगाव जिल्ह्यात 31 न्यायाधीश नव्याने बदलीने रुजू होणार

अशी आहे शाखानिहाय कार्यकारीणी
प्रभाग 24 मधील शाखाध्यक्ष- युवराज खरारे, उपाध्यक्ष कुणाल ठाकूर, सचिव यश सुरवाडे, शाखा सदस्य- कालिचरण खरारे, बॉबी जोहरी, धनराज पाटील, बंटी हंडे, वैभव सुरवाडे, विजय जोहरी, खुशाल जोहरी, रोहित सोनार, नितीन सोनार, पवन सोनार, चेतन ठाकूर, सोनू महाजन, मोनू महाजन, रोशन राजपूत तर
नाटकर चौकातील प्रभाग पाचमधील शाखाध्यक्ष- निलेश अंबेकर, उपाध्यक्ष रोहीत भोई, सचिव अर्जुन गायकवाड, सदस्य मोहन सूर्यवंशी, अनिल लोडते, कल्पेश वाघ, आदिल तडवी, कलिम शाह, अनिकेत इंगळे, राहुल पाटील, तनिष चौरसिया व प्रभाग दहामधील शाखाध्यक्ष- जफर सय्यद, उपाध्यक्ष सचिन देशमाने, सचिव सोनू शे ख, सदस्य नईम सय्यद, पवन सुरपाटणे, लोकेश खरे, विक्की कर्ण, समिश शेख, चेतन सोनार, तेजस गायकवाड यांची निवड करण्यात आली.



यांची उद्घाटन प्रसंगी उपस्थिती
भारतीय जनता युवा मोर्चा शहर सरचिटणीस श्रेयस इंगळे, उपाध्यक्ष गोपीसिंह राजपूत, उपाध्यक्ष देवेंद्र फालक, चिटणीस विनीत पाटील, लखन रणधीर, लोकेश जोशी, चेतन सावकारे, नागेश खरारे, अनुप पुरोहित, भाजयुमो प्रसिद्धी प्रमुख प्रशांत भट, सोशल मिडीया संयोजक विजय डोंगरे, सहसंयोजक मयुर सावकारे, कार्यकारी सदस्य तुषार कुरकुरे, भाजपा शहर सरचिटणीस अमोल महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते बिसन गोहर, अनिल चौधरी, शहर सहकार अध्यक्ष लव झाडगे, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्षा अनिता आंबेकर, शैलजा पाटील, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राहुल तायडे, अनु. जाती मोर्चा उपाध्यक्ष संतोष ठोकळ, रविंद्र दाभाडे, अजय नागराणी, खुशाल जोशी, दिनेश दोधानी, सागर जाधव, योगेश पाटील, अतुल धावडे, शंतनू पाथरवट, कपिल सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळात सण-उत्सवाच्या काळात उपद्रवींवर होणार कारवाई


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !