वहिनीचा विनयभंग करणार्‍या चुलत दिरास अटक : यावल तालुक्यातील घटना


यावल : यावल तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय विवाहितेचा तिच्या चुलत दिराने विनयभंग केला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर संशयीताला फैजपूर पोलिसांनी अटक केली.

पोलिस शिपायाला आता उपनिरीक्षक पदापर्यंत बढती : एसआरपीएफ कर्मचारी राज्य पोलिस दलात येणार

विवाहिता घरी असताना विनयभंग
यावल तालुक्यातील 24 वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. गुरुवार, 7 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान विवाहिता घरी असतांना तिचा चुलत मानलेला दिर याने घरात अनधिकृतपणे प्रवेश करून विवाहितेचा विनयभंग केला. या घटनेबाबत विवाहितेने फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व संशयीताला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक विकास सोनवणे करीत आहे.

माजी मंत्री खडसेंसह स्वीय सहाय्यकांसह तत्कालीन भाजपा पदाधिकार्‍यांचा फोन टॅप : पडद्यामागील मुख्य सूत्रधार समोर येण्याची अपेक्षा




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !