खडका गावातील एकाची गळफास घेत आत्महत्या


भुसावळ : धरणगाव तालुक्यातील नांदेड साळवा येथील मूळ रहिवासी व हल्ली खडका येथील राजेंद्र शंकर बर्‍हाटे (40) यांनी त्यांच्या राहत्या घरात शनिवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्म्हत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

यावल तालुक्यात पोलिसांचे वॉश आऊट : सहा जणांविरोधात गुन्हा 

भुसावळ तालुका पोलिसात नोंद
बर्‍हाटे यांनी त्यांच्या राहत्या घरातील स्वयंपाक घरातील पंख्यांला सुती दोरी बांधून घेत गळफास घेतला. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मोहन भिरूड यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.




पाचोर्‍यात पित्याचा चाकूचे वार करीत मुलांनी केला खून : पत्नीचा खुनाशी संबंध नाही


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !