सांगवी बु.॥ मध्ये जुगारावर छापा : नऊ जुगारींना अटक


यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे जुगार सुरू असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांनी छापा टाकत नऊ जुगारींना अटक केली. पोलिस निरीक्षक रवीकांत सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करण्यात आलली. हवालदार मुजफ्फर खान, सतीश भोई, सुशील घुगे यांनी कारवाई करीत संशयीत आरोपी कलिंदर तडवी, चेतन तायडे, सुभाष वडर, रमजान तडवी, रमजान नथू तडवी, हेमंत तेली, युवराज धनगर, सलीम तडवी यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !