ज्येष्ठ नागरीक समाजासाठी आधारवडच : अमोल जावळे

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे रघुनाथ आप्पा सोनवणे यांचा सन्मान


भुसावळ : तरुण राष्ट्राचे भवितव्य असले तरी वृद्धांना भूतकाळ म्हणणे योग्य ठरणार नाही कारण वृद्ध हे अनुभवाचे गाठोडे आहे. समाजातील आणि कुटूंबातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कौशल्य वृद्धांमध्ये असते.देशाची आणि समाजाची समृद्धी, संस्कृती आणि आदर्शत्वाची उंची ही ज्येष्ठ नागरीकांवर अवलंबून असते. ज्येष्ठ नागरीक हे समाजासाठी आधारवडच आहे रघुनाथ आप्पांचा या वयातील उत्साह आणि सामाजिक कार्य तरुणांना दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन अमोल हरीभाऊ जावळे यांनी केले.

अंतर्नादतर्फे रघुनाथ आप्पा सोनवणे यांचा सन्मान
बुधवारी अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रघुनाथआप्पा सोनावणे यांचा त्यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. सन्मानपत्र, शाल आणि पुस्तक देऊन त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल हरीभाऊ जावळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी उपस्थित होते. अमितकुमार पाटील यांचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला.


सन्मानाने नवीन कामाची उर्जा : रघुनाथ सोनवणे
रघुनाथ आप्पांचे कार्य समाजासाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे अश्या भावना युवराज लोणारी यांनी व्यक्त केल्या. समाजात ज्येष्ठांना अडगळीत टाकून त्यांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष केले जात मात्र अंतर्नाद प्रतिष्ठान कायमच ज्येष्ठांचा सन्मान करते. माझ्या क्षमतेप्रमाणे मी समाजाचं देणं लागतो या भावनेने समाज उभारणीला हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. या लहानश्या कार्याची दखल घेऊन अंतर्नादने जो सन्मान माझा केला आहे त्यामुळे मला पुन्हा काम करण्याची नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे, अश्या भावना सत्काराला उत्तर देतांना रघुनाथ आप्पा सोनावणे यांनी व्यक्त केल्या.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन तर आभार अमित चौधरी यांनी मानले. प्रसंगी या प्रसंगी शिक्षण तज्ञ डॉ.संजू भटकर, ग.स.जळगावचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, राकेश कोल्हे, प्रदीप सोनवणे, प्रा.श्याम दुसाने, समाधान जाधव, राजू वारके, भूषण झोपे, निवृत्ती पाटील, मंगेश भावे, सचिन पाटील, अविनाश तायडे आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !