खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणा यांना पोलिसांकडून अटक
मुंबई : दिवसभरातील नाट्यमय घडामोडीनंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतल्यानंतर खार पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. राणा दाम्पत्याविरोधात कलम 153 (अ) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे राणा दाम्पत्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागणार आहे.
ट्रक चालकासह क्लिनरला मारहाण करीत लूट : दहा जणांविरोधात गुन्हा
अखेर आंदोलन केले रद्द
मुंबईत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर वातावरण चांगलचं तापलेे मात्र राणा दाम्पत्य अमरावतीवरून मुंबईत देखील आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. शनिवारी सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही मातोश्रीवर जाणार नसल्याचं सांगत आपले आंदोलन रद्द केले. माध्यमांसमोर त्यांनी तशी घोषणा देखील दिली. यानंतर आता शिवसेनेकडून त्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपूरमध्ये पत्रकार परीषद घेत राणा दाम्पत्य आणि भाजपावर जोरदार टीका केली.

हा तर आमच्यावरील राजकीय सुड
रविवारी राणा दाम्पत्याला पोलिस ठाण्यात हजर केले जाणार असून त्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. पोलिस ठाण्यात असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब आणि शिवसेनेच्या 500 कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली दाखल केली आहे. आम्ही केवळ हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मातोश्रीबाहेर जाणार होतो. मात्र राजकीय सूडाच्या भावनेनं शिवसेना नेत्यांनी आमच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याची तक्रार राणा दाम्पत्यानं नोंदवली आहे.