मोहन नगरात बंद घर फोडले : 58 हजारांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
जळगाव : बंद घरे चोरट्यांना पर्वणी ठरत असून शहरातील मोहन नगरातही घरफोडीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घर फोडत सोन्याचच्या दागिन्यांसह एकूण 58 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपळे शिवारातून गोदामातून 24 क्विंटल गहू चोरट्यांनी लांबवला
बंद घरातून ऐवज लंपास
उज्वल दत्तात्रय ठाकूर (26, मोहन नगर, वृंदावन गार्डन जवळ, जळगाव) हा तरुण आपल्या आई व बहिणीसोबत वास्तव्यास असून मंगळवार, 19 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घराला कुलूप लावून नगर येथे काकांना भेटण्यासाठी उज्वल हा आई व बहिणीसोबत गावाला गेला असता चोरट्यांनी संधी साधली. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्याचे दागिने मिळून एकूण 58 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला.दरम्यान, घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर शेजारच्यांना शंका आली व त्यांनी उज्वल यास फोन केल्यानंतर खातरजमा केली असता चोरीची बाब उघडकीस आली. या प्रकरणी बुधवार, 28 एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात उज्ज्वल ठाकूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुशील चौधरी करीत आहे.
