जुन्या वादातून नागसेन नगरात तरुणावर ब्लेड मारून हल्ला


जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून ब्लेडने वार तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना शहरातील नागसेन नगरात घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपळे शिवारातून गोदामातून 24 क्विंटल गहू चोरट्यांनी लांबवला

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
जळगाव शहरातील नागसेन नगरात राहणारा राकेश भीमराव सपकाळे (22) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार, 26 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता मागील भांडणाच्या कारणावरून त्याच्या गल्लीतील रोहिदास झाल्टे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून शिविगाळ करून ‘तू डॉन झाला आहे का, असे म्हणून खिशातील ब्लेड काढून वार करून जखमी केले. यात राकेश सपकाळे हा जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला. या प्रकरणी राखी सपकाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी रोहिदास झाल्टे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेंद्रसिंग पाटील करीत आहे.


जळगावात भरधाव ट्रकने चिरडल्याने विवाहिता जागीच ठार तर भाचा जखमी 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !