प्रतिकुल परीस्थितीला धैर्याने तोंड दिल्यास जीवन सुखर

भुसावळात प्रा.डॉ.म.सी.हळपे : अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाची सभा


भुसावळ : प्रतिकुल परीस्थितीत धैर्याने तोंड दिल्यास जीवन सुकर होते, उद्याची चिंता करण्यापेक्षा आजच्या क्षणाचा आनंद लुटा, खंत करीत बसू नका, असे विचार प्रा.डॉ.म.सी.हळपे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील नवशक्ती आर्केडच्या प्रांगणात झालेल्या अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाच्या साप्ताहिक सभेत बोलत होते.

नकारात्मक वृत्तीने सोन्याची माती
यावेळी बोलताना डॉ.हळपे यांनी नकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांची कलात्मक रितीने उदाहरणे देऊन कोरोना काळात खचलेल्या श्रीमंत वृद्धांची सत्यकथा सांगितली. ते म्हणाले की, सकारात्मक वृत्तीचे लोक मातीचं सोनं करतात आणि नकारात्मक प्रवृत्ती सोन्याची माती करतात. अध्यक्षस्थानी संघाचे प्रभारी अध्यक्ष सुरेश कुरंभट्टी होते. कार्यक्रमाची सुरूवात शकुंतला भंगाळे यांनी रामनामाने केली. शीला उपाध्ये यांनी श्री. गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन व विश्व प्रार्थना सादर केली. लता बेंडाळे यांनी वक्ते प्रा.डॉ.म.सी.हळपे यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष सुरेश कुरंभट्टी यांनी वक्त्यांचा यथोचित सत्कार केला. डॉ.अनिता अवचट स्वतः कॅन्सर पेशंट असून देखील परिस्थितीचा स्वीकार करीत सत्याला त्या कशा गेल्या हे खुमासदार शैलीत सांगितले. त्यावेळी श्रोते सद्गदित झाले. अभंग, शायरी, विनोद यांचा स्वैर वापर करीत व्याख्यान रंगवले. सुनंदा औंधकर यांनी आभार मानले. या प्रसंगी गजानन ठाकूर, दिनकर बेंडाळे उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !