घरफोडीच्या प्रयत्नातील दोघा गुन्हेगारांना अटक


जळगाव : अट्टल घरफोडे जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून कारसह चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. अरविंद उर्फ आरु अरुण वाघोदे (25, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) व अनिल रमेश चौधरी (40, रा.अयोध्या नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

भुसावळसह जळगावातील दुचाकी चोरटे जळगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात

गस्तीदरम्यान संशय आल्याने आरोपी अडकले जाळ्यात
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचार्‍यांचे पथक एमआयडीसी परीसरात गस्तीवर असताना संशयीत अनिल चौधरी व अरविंद वाघोदे यांना यांच्या वाहनातील संशयास्पद हालचाली पाहून थांबवल्यानंतर त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्यानंतर
वाहनाची झडती घेतली असता त्यात घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळल्याने या साहित्यासह कारही जप्त करण्यात आली. अटकेतील संशयीत पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.


पारोळा शहरातील 25 वर्षीय विवाहितेचा विनयभंग : आरोपीला अटक


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !