….तर हनुमान चालिसा लावा ; राज ठाकरे


औरंगाबाद : लाऊडस्पीकर हा नवीन विषय नाही, तो धार्मिकही विषय नाही. तो सामाजिक विषय आहे. आता 3 तारखेला त्यांचा सण आहे, त्यांच्या सणात मला विघ्न आणायचं नाही. पण, 4 तारखेनंतर मी ऐकणार नाही. माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की, 4 तारखेनंतर मंदिरांसमोर हनुमान चालिसा लावा, दुप्पट आवाजात लावा. हवं तर पोलिसांची परवानगी घ्या. पण, जर हे भोंगे उतरले नाहीत, तर हनुमान चालिसा लावा.  विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही, अशा शब्दांत राज यांनी थेट इशाराच रविवारी सायंकाळी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत दिला.

शरद पवारांवर हल्लाबोल
शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत, तेच मी सभेत सांगितलं. मात्र, पवारांना ते झोंबलं, लागलं. त्यानंतर लगेचच पवारांचे मंदिरातले फोटो येऊ लागले. मात्र, पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी स्वत: लोकसभेत सांगितलं होतं की माझे वडील नास्तिक आहेत, असे राज म्हणाले. माझ्या भाषणांमुळे समाजात दुही माजतेय. राज्यासाठी, देशासाठी हे बरं नव्हे, असं शरद पवार म्हणतात. राज्यात असे भेदाभेद कोणी निर्माण केले? राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर समाजात तेढ निर्माण झाली, हे मी आधीही म्हटलंय आणि आताही म्हणतोय. शरद पवार मला माझ्या आजोबांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला देतात. ती पुस्तकं मी आधीच वाचली आहेत. तुम्ही केवळ तुम्हाला हवं तितकंच आणि सोयीचं वाचू नका. मी लेखकांची जात पाहून पुस्तकं वाचत नाही. मी मुळात जातच मानत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.



महाराष्ट्र जातीत सडतोय
शरद पवारांना हिंदू शब्दांचीच अॅलर्जी आहे, असे म्हणत महाराष्ट्रात शरद पवारांवर जातीय तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. आता पवार हे शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहेत. अठरा पगड जाती महाराष्ट्रासाठी झटत होत्या. पण, आज महाराष्ट्र जातीत सडतोय, असे म्हणत राष्ट्रवादीनेच जातीवाद पेरल्याचा घणाघात राज यांनी येथील सभेत केला.

कधी दुही माजवली नाही
जे लोक आपला इतिहास विसरतात त्या देशाचा भूगोल बदलतो, असं राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत म्हणाले. मी दुही माजवतोय असा आरोप शरद पवार यांनी माझ्यावर केला, पण मी कधीही दुही माजवली नाही. पण शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कधी केला आहे का? आता शरद पवार तल्लीन झालेले दिसत आहेत, गीता रामायण ऐकत आहेत आणि बाजूला शिवाजी महाराजांचा फोटो आहे, हे नाटक कशासाठी ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. पवारांनी जातीयवादाचे विष पसरवले आहे असं राज ठाकरे म्हणाले. याआधी शरद पवारांनी म्हटले होते, की प्रबोधनकारांचे विचार राज यांनी वाचायला हवे होते. त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी केवळ सोयीनेच प्रबोधनकार वाचू नये. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच जातीयवादाचं विष पेरलं आहे असं राज ठाकरे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !