अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल : माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती


मुंबई (2 जून 2026) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी
राज्य माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या अत्यंत वादग्रस्त बदलांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाची आणि मागण्यांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून बदलांना तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्य माहिती आयोगाला पाठवलेल्या पत्राची दखल घेत मुख्य माहिती आयुक्तांनी हे बदल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे माहिती अधिकार क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना आणि अण्णा हजारे यांच्या लढ्याला मोठे यश आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट पत्र आणि स्थगिती
अण्णा हजारे उपोषणावर ठाम राहिल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या विषयात मध्यस्थी केली. मुख्यमंत्र्यांनी राज्य माहिती आयोगाला थेट एक पत्र पाठवले. या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केले की, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा केल्याशिवाय माहिती अधिकार कायद्यात कोणताही बदल किंवा निर्णय घेणे उचित ठरणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या महत्त्वाच्या विनंतीनंतर आणि त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्य मुख्य माहिती आयोगाने 12 जून रोजी राजपत्रात प्रकाशित केलेल्या सर्व बदलांना स्थगिती दिली आहे.



2005 संदर्भात सुधारित अधिसूचना जारी केली
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता. शासनाने 12 जून रोजी माहिती अधिकार कायदा 2005 संदर्भात सुधारित अधिसूचना जारी केली आहे. मात्र, त्यास सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या कायद्यानुसार आतापर्यंत माहिती अधिकार कायद्याचा वापर करून माहिती मागवताना होणारा 10 रुपयाचा खर्च होता, मात्र आता तो खर्च 30 रुपयांवर गेला आहे. यासोबतच प्रथम अपील 50 रुपये तर दुसर्‍या अपिलासाठी शंभर रुपये शासनाकडे जमा करावे लागणार आहेत.

सामान्यांना आता माहिती मिळणे सुलभ
मिळालेल्या माहितीसाठी प्रतिपान दोन रुपयावरून प्रतिपान पाच रुपये इतकं शुल्क संबंधित विभागाकडून आकारला जाणार आहे. या नियमासह एकूण 12 नियम करण्यात आले आहेत. या नियमांमुळे सामान्य नागरिकांना माहिती मिळवणं अशक्य होणार आहे. माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, पैसे कमावण्याचं साधन नाही. काही लोक याचा गैरफायदा घेतात त्यामुळे शुल्क आकारणं गरजेचे आहे मात्र यातून पैसे कमावणे हा उद्देश नसावा, असे अण्णांनी म्हटलं होतं. फडणवीस सरकारने केलेले बदल पुन्हा पूर्ववत केले नाही, तर आपण उपोषण करणार असल्याचं देखील अण्णा हजारे यांनी म्हटले होते मात्र अण्णांच्या आंदोलनानंतर सरकार नरमले असून नव्या बदलांना स्थगिती देण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !