अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार


Jalgaon Accidant जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अभिजीत विनायक कोचूरे (22, महावीर नगर, दुध फेडरेशन, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

बंद घर फोडून रोकडसह एक लाखांचे दागिने चोरीला : पारोळ्यातील घटना

सुप्रीम कंपनीजवळ अपघात
अभिजीत हा तरुण आई, वडिलांसह वास्तव्यास होता. 3 मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तो दुचाकीने पहूर येथून जळगावकडे येत असतांना गाडेगाव येथील सुप्रीम पाईप कंपनीजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वाहनधारकांनी तातडीने खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.



अज्ञात वाहनाच्या धडकेने नशिराबादच्या वृद्धाचा मृत्यू


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !