जळगावातून पुन्हा दुचाकीची चोरी


जळगाव : शहरातील डी-मार्ट परीसरातून तरुणीची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी गुरुवार, 5 मे रोजी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम
हर्षदा अंकुश निकम (20, हनुमान मंदिरासमोर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) या कामामित्ताने दुचाकी (एम.एच .19 डी.ई.4564) डी.माट जवळील ब्युटी पार्लरजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकी पार्क केली. काम आटोपल्यानंतर त्या सायंकाळी सात वाजता दुचाकीजवळ आल्या असता दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. गुरुवार, 5 मे रोजी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !