कोपरगाव तालुक्यातील भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार
Six passengers were killed on the spot in a tragic accident in Korapgaon taluka अहमदनगर : महामार्गावरील अपघाताची मालिका थांबायला तयार नाही. भरधाव कंटेनरला अॅपे रीक्षाला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर चांदेकसारे (ता.कोपरगाव) येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजता हा अपघात घडला. अपघातातील सर्वच मयत अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासीत आहेत.
महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून यावलच्या तरुणावर चाकूहल्ला
सकाळच्या सुमारास भीषण अपघात
भरधाव कंटेनर (पी.बी.05 ए.बी.4006) समोरून येणार्या मोटारसायकलला कट मारून प्रवासी वाहतूक करणार्या अॅपे (एम.एच.17 ए.जे.9056) ला धडक दिल्यानंतर रीक्षातील सहा प्रवासी जागीच ठार झाले तर रीक्षातील अन्य प्रवाशांसह संबंधित मोटारसायकलवरील तिघे मिळून सात जण जखमी आहेत.


यांचा अपघातात झाला मृत्यू
भीषण अपघातात राजाबाई साहेबराव खरात (60, चांदेकसारे), आत्माराम जम्मानसा नाकोडे (65, वावी), पूजा नानासाहेब गायकवाड (20, हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (20, चांदेकसारे), शैला शिवाजी खरात (42, श्रीरामपूर), शिवाजी मारुती खरात (52, श्रीरामपूर) यांचा मृत्यू झाला.
अपघातात हे प्रवासी जखमी
जखमींमध्ये विलास साहेबराव खरात (34, चांदेकसारे), कावेरी विलास खरात (5, चांदेकसारे), रुपाली सागर राठोड (40, सिन्नर), धृव सागर राठोड (17, सिन्नर) यांच्यासह दुचाकीवरील दिगंबर चौधरी व त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी (12), बहिण कृष्णाबाई गोविंद चौधरी (42, सर्व राहणार पोहेगाव), हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग (42, दानामंडी, लुधियाना, पंजाब) हा नाशिकच्या दिशेने पळ काढत असताना स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.