सोशल मिडीयावरील बनावट खात्यांद्वारे महिलेची बदनामी : एकाविरोधात गुन्हा


भडगाव : भडगाव तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेची इन्स्टाग्राम, फेसबुकवर बनावट खाते तयार करुन त्यावरुन महिलेचे फोटो व्हायरल करुन बदनामी करण्यात आली. या प्रकणी शनिवार, 7 मे जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

30 वर्षीय महिलेच्या बदनामीप्रकरणी गुन्हा
भडगाव तालुक्यातील एका गावात 30 वर्षीय विवाहित महिला वास्तव्यास आहे. विवाहितेचे वेगवेगळ्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करीत त्यावर महिलेचे फोटोचा वापर करुन खाते तयार केले तसेच फोटो व्हायरल केले. 16 डिसेंबर 2021 पासून अशाच पध्दतीने अज्ञाताने महिलेचे बनावट खाते तयार करुन त्यावरुन फोटो व्हायरल करत तिची बदनामी केली. 6 मे 2022 रोजी हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्याने तिने याबाबत जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !