विवाहितेला शिविगाळ करीत मारहाण : टोळीतील घटना


पारोळा : तालुक्यातील टोळी येथे क्षुल्लक कारणावरून विवाहित महिलेस मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर कारवाईची संक्रांत : आरक्षीत डब्यांसह विनातिकीट प्रवास करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

एकाविरोधात गुन्हा
एका महिलेने पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या घरात स्वयंपाक करत असताना घराजवळ राहणारे भागवत भानुदास पाटील हे आरोळ्या मारत घरासमोरील खाटा फेकत होते. त्याचा जाब विचारल्याने भागवत पाटील यांनी पीडित महिलेला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली तसेच घरा लगतची भिंत पाडून अंगणातील महापुरूषाच्या पुतळ्याची विटंबना केली. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.

पट्टेदार वाघाचे सुकळी परीसरात पुन्हा दर्शन ; शेतकर्‍याने मोबाईलमध्ये छबी केली कैद


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !