मुक्ताईनगर हादरले : बंद सराफा दुकानातून 30 लाखांचे दागिने दरोडेखोरांनी लांबवले
Muktainagar Daroda मुक्ताईनगर : शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्सचे शटर वाकवून दरोडेखोरांनी दुकानातील सोनन्यासह चांदीचे दागिने मिळून 30 लाखांचे ऐवज लांबवला. ही बाब सोमवार, 9 रोजी मे पहाटे उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर कारवाईची संक्रांत : आरक्षीत डब्यांसह विनातिकीट प्रवास करणार्यांवर दंडात्मक कारवाई
धाडसी चोरीमुळे उडाली खळबळ
अंबिका ज्वेलर्सचे संचालक अनिल शूरपाटणे यांच्या माहितीनुसार, सोमवार सकाळी दुकानात दरोडा पडल्याची माहिती मिळाली. यात सुमारे 25 लाख रुपयांची चांदी तर पाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, या संदर्भात मुक्ताईनगर पोलिस स्थानकाला माहिती दिली असून पंचनामा करून याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर जळगावहून तपासासाठी श्वान पथक निघाले आहे. भर बाजारपेठेत असलेल्या सराफा दुकानातील या धाडसी दरोड्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.