भुसावळातील निकृष्ट पोषण आहार प्रकरण : प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले लक्ष


भुसावळ : शहरातील तु.स.झोपे शाळेत निकृष्ठ धान्य आढळून आल्याची तक्रार वंचित आघाडीने केल्यानंतर धान्याचा पंचनामा करून गोदामाला सील करण्यात आले होते तर नंतर पोषण आहार अधीक्षकांच्या उपस्थितीत पुन्हा धान्याचे नमूने घेवून ते तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. औरंगाबाद येथील प्रयोग शाळेचा अहवाल आल्यावर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.

तक्रारीची शिक्षण विभागाकडून दखल
तु.स.झोपे शाळेत निकृष्ट दर्ज्याचे धान्य आढळल्यानंतर तांदूळ व अन्य धान्याचे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. गुरुवारी शाळेतील धान्याचे गोदाम सील केल्यानंतर शुक्रवारी शालेय पोषण आहार अधीक्षक अजीत तडवी यांच्या उपस्थितीत धान्याचे नमूने घेवून ते तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. दरम्यान, धान्याचा एक नमुना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व जिल्हा महासचिव दिनेश इखारे यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला असून एक नमुना विनोद सोनवणे, दिनेश इखारे स्वतः तपासणी साठी औरंगाबाद येथे पाठविणार असल्याचे सांगितले.

निकृष्ट आहाराची व्हावी चौकशी 
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये निकृष्ठ दर्जाचा शालेय पोषण आहार वाटप केला जात असून त्याच्या तपासणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याची वरीष्ठांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली आहे. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक, शिवाजीराव टेंभुर्णीकर, भुसावळ तालुका सचिव गणेश इंगळे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, बंटी सोनवणे, रुपेश कुर्‍हाडे, गौतम लोखंडे व पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !