जिल्हा रुग्णालयात कैद्यांच्या दोन गटात ढिशूम-ढिशूम : चार पोलिसांवर निलंबनाची कुर्‍हाड


Suspension Of Four Policemen From the District Police Force जळगाव : कैद्यांच्या दोन गटात रविवारी जिल्हा रुग्णालयात हाणामारी झाली होती. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत चार पोलिस कर्मचार्‍यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबीत (Suspension Of Four Policemen From the District Police Force) केल्याने पोलिस कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पाचशे रुपयांची लाच पोलिसाला भोवली : एसीबीच्या कारवाईने पोलिस वर्तुळात खळबळ

गोपनीय अहवालाअंती कारवाई
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कैदी सतीश गायकवाड व दशरथ महाजन या दोघांमध्ये रविवारी रात्री कैदी वॉर्डात वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी वॉर्ड क्रमांक 9 मधील डॉक्टरांनी गोपनीय अहवाल वैद्यकीय अधिष्ठातांना दिला. यात रुग्णालयाच्या वॉर्डात येणारे कैदी पोलिसांच्या उपस्थितीत दारू प्राशन करून धुमाकूळ घालतात, असे नमूद करण्यात आले होते. या कृत्यांमुळे जिल्हा रुग्णालयातील शेजारच्या वॉर्डात दहशत पसरली असून, रुग्णांना त्रास होतो आहे, असे नमूद करण्यात आले होते.

या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई
या प्रकाराची पोलिस प्रशासनानेही गंभीर दखल घेतली. पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्वत: या प्रकरणी चौकशी केली असता यामध्ये पोलिस कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा दिसून आला. यासाठी त्यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. या अनुषंगाने चौकशीअंती डॉ.मुंढे यांनी पोलिस कर्मचार्‍यांवर हलगर्जीपणावर ठपका ठेवत संदीप पंडितराव ठाकरे, पारस नरेंद्र बाविस्कर, किरण अशोक कोळी, राजेश पुरुषोत्तम कोळी या चौघा पोलिसांना निलंबित (Suspension Of Four Policemen From the District Police Force ) केले आहे.

दीपनगरात विवाहितेची आत्महत्या : पतीविरोधात गुन्हा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !