शारीरिक सुखाची मागणी करीत तरुणीचा विनयभंग ; चौघांना अटक


जळगाव : शिक्षण घेत असलेल्या तरूणीला लैंगिक सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

चौघा आरोपींविरुद्ध गुन्हा
१९ वर्षीय पिडीत तरुणी ही औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहे. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. दरम्यान ११ जानेवारी ते १३ मे दरम्यान पिडीत मुलीला देवेंद्र भागवत पाटील (२१, रा. नायगाव ता.यावल), अजय मनोज माळी (२०, रा. तळेगाव ता. जामनेर), कमलेश भटू भामरे (19, सुराजय ता. शिंदखेडा जि.धुळे) आणि अभिषेक रमेश बाविस्कर (19, फर्दापूर, ता. सोयगाव, जि.औरंगाबाद) यांनी वेळोवेळी तरूणीशी अंगलट करत उघडपणे लैंगिक सुखाची मागणी केली. या छळाला कंटाळून तरूणीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !