तलाठ्यासोबत घातली हुज्जत : एकाविरोधात गुन्हा
भडगाव : तालुक्यातील निंभोरा येथील गिरणा पात्रात वाळू माफियाने तलाठ्यासोबत हुज्जत घातल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी हलकारे यांच्याशी अरेरावी
तालुक्यातील निंभोरा येथे १५ रोजी पहाटे एका ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू विना परवाना वाहून नेली जात होती. तलाठी पाशा हलकारे यांनी संबंधित चालकाला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. मात्र, चालकाने ट्रॅक्टरमधील वाळू उपसून, तलाठी हलकारे यांच्याशी अरेरावी केली. तुम्हाला जे करायचे ते करून घ्या, अशी दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रसंगी त्याने तलाठ्यांशी अरेरावी देखील केली.
पोलिसात गुन्हा दाखल
या अनुषंगाने तलाठी पाशा हलकारे यांच्या भडगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात संशयीत सचिन राजेंद्र जाधव (रा.कोटली) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक मनोज माळी हे तपास करत आहेत.







