बालिका मृत्यू प्रकरणी फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

रीपाईंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशींची पत्रकार परीषदेत मागणी


भुसावळ : वरणगाव आयुध निर्माणीतील धम्म विहारातील उद्यानाच्या झोपाळ्यावरुन पडून शहरातील धम्म नगरातील रहिवासी समिक्षा अरुण सावळे या सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. या प्रकरणी आयुध निर्माणीतील उद्यानांची जबाबदारी असलेल्या बेजाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी बुधवारी शासकिय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे दुर्घटना
शहरातील जळगावरोडवरील धम्म नगरातील रहिवासी अरुण सावळे हे आयुध निर्माणी वरणगाव येथे सोमवार, १६ रोजी मावस साल्याच्या लग्नासाठी गेले होते. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बुध्द विहारातील झोपाळ्यावर त्यांची मुलगी समीक्षा (६) खेळत असताना पाळणा जमिनीपासून निघाला व समिक्षा फेकली गेली. तिच्या डोक्यावर मागील बाजूस मार लागला. पाळण्याचा आडवा रॉड मेंदूवर पडल्याने तिच्या नाकातोंडातून रक्तप्रवाह सुरु झाला. वरणगाव येथून भुसावळात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आयुध निर्माणी वरणगाव येथील बुध्द विहार व उद्यान आयुध निर्माणीच्या अख्यतारीत आहे. या घटनेला आयुध निर्माणीचे व्यवस्थापकिय अधिकारी यांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा जबाबदार आहे. यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीने बालिकेचा बळी गेला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. उद्यानातील देखरेख व व्यवस्था करणारे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेला मृत बालिकेचे वडील अरुण सावळे, रिपाईंचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी केला.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
यावेळी रिपाईंचे युवा जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे, शरद सोनवणे, पप्पू सुरवाडे, सुनील ढिवरे आदी उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !