दोघांचे प्रेम जडले अन त्यांनी जोडीदारांनाच सोडले
बीड : प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. या वाक्याला साजेशी घटना बीड जिल्ह्यात घडली असून दोघाही विवाहितांनी पती व पत्नीला सोडत धूम ठोकल्याचा प्रकार उघड झाला आहे. जोडीदारांना या प्रकरणी घटना कळताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.
प्रेम प्रकरणातून दोघे रफुचक्कर
तिला चार मुले असून तो एका गोंडस बाळाचा पित्या असून दोघांचे एकमेकांशी सूत जुळताच त्यांनी जोडीदारांना सोडून पळ काढली. या प्रकरणी दोघांनीही पोलीस ठाणे गाठून साहेब, आमचा जोडीदार शोधून आणा, अशी दाद मागितली आहे. तान्हुल्या सोबत घेवून महिलेच्या माहितीनुसार तिच्या पतीचे सोबत आलेल्या तरुणाच्या पत्नीशी प्रेमप्रकरण सुरू असून, ते दोघे घरात न सांगता पळून गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर सोबतचा तरुण आपले गार्हाणे सांगत म्हणाला की, तो हॉटेलात काम करतो, त्यास चार अपत्ये आहेत. तो दिवसभर हॉटेलात कामाला जायचा. इकडे पत्नीचे यांच्या पतीशी कनेक्शन कधी जुळले, हे मला कळालेच नाही. तेव्हा माझ्या पत्नीला परत आणून द्या तर महिलेने माझ्या पतीला यांच्या पत्नीपासून सोडवा व शोधून आणा, असा सूर लावला. पोलिसांनी खोलवर विचारपूस केली तेव्हा ते दोघे पळाले म्हणजे शहर सोडून गेले, असे नाही तर शहरातच वेगळी खोली घेऊन ते राहत असल्याची माहिती समोर आली.

साकळी गावात रोखला बालविवाह







