आठ गंभीर गुन्ह्यातील हद्दपार आरोपी गावठी कट्ट्यासह जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Accused person externed due to eight serious crimes falls into the Jalgaon Crime Branch’s net with a country-made pistol जळगाव (2 जुलै 2026) : पोलीस दप्तरी कुख्यात असलेल्या व आठ गंभीर गुन्ह्यांमुळे हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला शहरात गावठी कट्टा बाळगून अनधिकृतरित्या शहरात प्रवेश केल्याप्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली (32, बौद्ध विहाराजवळ, गेंदालाल मिल, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना संशयित आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने गुरुवारी, 2 जुलै रोजी गेंदालाल मिल परिसरात छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. अटकेतील विजय अहिरे हा जळगाव पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण आणि दंगल घडवणे यांसारखे तब्बल आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने गावठी कट्टा बाळगल्याने व हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, छगन तायडे, रवींद्र कापडे, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !